नारायण राणेंची तोफ कडाडणार कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौकात

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेसला रामराम ठोकून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौरा करणार आहेत. शुक्रवारी म्हणजेच ८ डिसेंबरला कोल्हापूरमधील दसरा चौकात राणे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राणे समर्थकांकडून जंगी तयारी करण्यात येत आहे.

नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत राजकारणात आपली वेगळी चूल मांडली आहे. भाजप प्रणीत एनडीएला त्यांच्या पक्षाकडून पाठींबा देण्यात आला . दरम्यान राणे यांना विधानपरिषदेवर घेवून मंत्री करण्याचा भाजपचा मनसुबा शिवसेनेच्या दबावामुळे पूर्ण होवू शकलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला कट्टर दुश्मन समजणारे राणे आणखीनच आक्रमक होणार हे दिसत आहे. मागील आठवड्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दूर केला होता. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.