नारायण राणें निवडणुकांच्या तयारीला; आज मुंबईत मेळाव्याला हजेरी

नारायण राणे

मुंबई: आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे हे मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. आगामी सर्व निवडणुकांच्या तयारीला राजकीय पक्ष मैदानात उतरले असतांना या पार्श्वभूमीवर नारायण राणे काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सायंकाळी ७ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मेळाव्याचे आयोजन होणार आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने लढवण्याचा निर्णय घेतला आहे २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणूका तसेच होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

Loading...