मुंबई : नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब शिवसैनिकांना साभाळून घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरे हे कपटी माणूस असून लबाड लांडगा आहे. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी छोटा शकील, छोटा राजन टोळीला उद्धव ठाकरेंनी दिली होती, असे आरोप राणेंनी ठाकरेंवर केले आहेत. या आरोपांना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नारायण राणे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं कायंदे यांनी म्हंटल आहे. “आज पत्रकार परिषदेत त्यांची जी अवस्था झाली होती. ते बघून मी एवढंच म्हणेल, नारायण राणे कृपया लवकर बरे व्हा”, असा खोचक टोला कायंदे यांनी राणेंना लगावला आहे.
नारायण राणे यांनी मुंबईला यावे, एखादी पत्रकार परिषद घ्यावी आणि उद्धव ठाकरेंवर आगपाखड करावी, यासाठीच भाजपाने त्यांना मंत्रीपद दिलं असल्याचं त्या म्हणाल्या. कदाचित यानंतरच त्यांचा पगार होत असेल असं म्हणत त्यांनी राणेंना चिमटा काढला आहे. नारायण राणेंचे आरोप नेहमीचेच आहेत. त्यांना हिंदुत्त्वाबाबत बोलायचा अधिकार नाही. कारण राणे आणि हिंदुत्त्व हे समीकरण जुळत नाही, अशी बोचरी टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.
“शिवाजी पार्कवर झालेले उद्धव ठाकरेंचे भाषण सर्वांनीच ऐकले. त्यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत का गेले? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये का गेले? उद्धव ठाकरेंनी यांनी यावेळी बेरोजगारीवर, नोटबंदी असे अनेक मुद्दे उपस्थित केले. हे प्रश्न भाजपाच्या जिव्हारी लागले आहेत. याची उत्तरं त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांची आगपाखड होते आहे”, असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- evendra Fadanvis | उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी-देवेंद्र फडणवीस
- Travel Guide | ‘हे’ 5 हिंदी भाषिक देश फिरण्यासाठी ठरतील सर्वोत्तम ठिकाणं
- Narayan Rane । उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा घणाघात
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुखाबरोबरच पक्षाध्यक्षाचाही दावा
- Narayan Rane । “उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, त्यानं…”; नारायण राणेंची जीभ घसरली