fbpx

‘तो’ पराभव कधीही विसरणार नाही, शिवसेनेन केलेला पराभव राणेंच्या जिव्हारी

टीम महाराष्ट्र देशा: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दारूण पराभव केला होता. नाईक यांनी केलेला पराभव राणेंच्या जिव्हारी लागला आहे. याची सल राणे यांनी बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर हि मागच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तो मी कधीही विसरणार नाही, अशी भावना नारायण राणे यांनी मालवणमधील कार्यकर्ता बैठकीत बोलून दाखवली आहे.

मालवणबद्दल आपल्याला प्रेम आहे, १९९० पासून मला ८० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य मिळत होते. गेल्यावेळी नीलेश राणे यांना ३५ टक्के मते कमी मिळाली. त्यामुळे आता मालवणला मागासलेले ठेवायचे नसेल तर आगामी निवडणुकीत मला ८० ते ८५ टक्के मतदान व्हायला हवे, त्यासाठी तातडीने कामाला लागा, असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालो, कुडाळमधूनच सहावेळा आमदार म्हणून विजयी झालो, मात्र याच मतदारसंघात नवख्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला, नाईक यांच्याकडून झालेला पराभव आपण कधीही विसरणार नाही, अशी खंत नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या