fbpx

२०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू ,नारायण राणेंची डरकाळी

टीम महाराष्ट्र देशा- विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा जिल्हा पिछाडीवर गेला आहे. त्याला शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे राज्य आणि जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्या या सर्वच राजकीय पक्षांना जनमाणसांच्या मनातून उध्वस्त करुन २०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू, असा विश्वास स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

वैभववाडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना सर्वच पक्षांना राणे यांनी टार्गेट केल. राणे पुढे म्हणाले की, चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. सर्व पक्षांचे राजकारण जवळून पाहीले. परंतु कोणताही पक्ष दीन-दुबळ्यां, जनसामान्यांच्या हिताचे, राजकारण करीत नाही. यावर आपले मत ठाम झाले. त्यामुळेच जनतेच्या हिताचा विचार करुन स्वाभिमान पक्ष काढण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे जात-धर्म विसरुन ‘कोकणी माणूस’ म्हणून स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी केले.