…तर खासदारकीचा राजीनामा देईन : नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा- गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ पण नाणारची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा खा. नारायण राणे यांनी दिला आहे. नाणारची एकही वीट रचू देणार नाही. राज्यसभेचा खासदार जरी असलो तरी कोकणचा सुपुत्र आहे. शिवसेनेसारखं बोलून नाही दाखवणार, गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा फेकेन, खासदार जरी भाजपचा असलो तरी विरोध कायम राहणार असं म्हणत नारायण राणेंनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे ?

गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ पण नाणारची एकही वीट रचू देणार नाही.मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे की, मी जनतेच्या बाजुनं आहे.नाणारची एकही वीट रचू देणार नाही. राज्यसभेचा खासदार जरी असलो तरी कोकणचा सुपुत्र आहे. शिवसेनेसारखं बोलून नाही दाखवणार, गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा फेकेन, खासदार जरी भाजपचा असलो तरी विरोध कायम राहणार.

दरम्यान,रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रस्तावित प्रकल्पाला विरोध आहे. मात्र हा विरोध असतानाही ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या