नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, भाजप प्रवेशावर चर्चा होण्याची शक्यता

narayan rane and cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. गेले काही दिवस नारायण राणे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. या दुरावाच्या पार्श्वभूमीवरचं नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत असल्याचं सांगितल जात आहे. तसेच नारायण राणे हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्याबाबत देखील चर्चा होणार असल्याचं सांगितल जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. खासकरून हे पक्षांतर शिवसेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पक्षांतराच्या गंगेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे देखील हात धुवणार असल्याचं दिसत आहे. कारण राणे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. एबीपी माझाच्या एका विशेष कार्यक्रमात मुलाखतीवेळी राणे यांनी याबाबतचे सूचक विधान केले आहे.

Loading...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मला भाजपात येण्या साठी अनुमती दिली आहे. केवळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुमती बाकी आहे. ती एकदा मिळाली की भाजपात जाणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितले आहे. पत्रकारांनी आपण भाजपात केव्हा जाणार असे नारायण राणेंना विचारले होते. यावेळी नारयण राणेंनी सूचक विधान केले.

दरम्यान राणे यांनी ‘मी भाजपमध्ये राहणार की माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. येत्या चार पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत निर्णय कळवणार आहेत, त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं नारायण राणेंनी सांगितले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण