नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय

blank

टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे नाराज असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे राणे यांना शिवसेनेच्या विरोधामुळे स्वतंत्र पक्ष काढावा लागला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही असल्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.

आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलतानाही राणे यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. मनात नसताना देखील दिल्लीत जाव लागल्याचं त्यांनी सांगितले होते. तसेच येत्या १० दिवसांत विधानसभेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून सामोरे जाणार कि भाजपमध्ये जाणार याचा निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेन जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दोन्ही पक्षाचे नेते युतीने लढण्याचा दावा करत आहेत, परंतु स्वतंत्र लढण्याची चाचपणी देखील केली जात आहे. यामध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश देत कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. राणेंच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत असल्याचं राणेंनी यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या