राणे – भुजबळांमध्ये अर्धा तास खलबतं ; चर्चा मात्र गुलदस्त्यात

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. यात आता नारायण राणे यांची भर पडली आहे. आता भुजबळ-राणे यांच्या भेटीमुळं राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.

नारायण राणे यांनी आज वांद्रे येथील एमईटी संस्थेत छगन भुजबळ यांची भेट घेतली. राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे पहिल्यांदाच भेटले आहेत.