अखेर नारायण राणे यांचा कॉंग्रेसला रामराम

नारायण राणे यांनी काढली कॉंग्रेसची पिसे

नाही हो नाही हो म्हणत अखेर आज नारायण राणे यांनी कॉंग्रेसला अखेरचा रामराम ठोकला आहे. याबाबतची माहिती त्यांनी कुडाळमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी नारायण राणे यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची अक्षरशः पिसे काढली आहेत. त्याच बरोबर कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

यापुढे आता राज्याचा दौराकरून पुढील निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितल आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जरी नारायण राणे यांनी टीका नसली केली तरी अशोक चव्हाण यांना कोणाच्या मागे लोक आहेत हे दाखवून देऊ अस म्हणत चांगलाच फैलावर घेतल. मला आमदार करू नये यासाठी अशोक चव्हाण दिल्ली मध्ये तळ ठोकून बसल्याचा गौप्यस्फोट देखील राणे यांनी केलाय.