नारायण राणे दिल्लीकडे रवाना ; केंद्रीय मंत्रीपद मिळणार ?

narayan rane

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने दिल्लीत काही बैठकाही झाल्या आहेत. केंद्रात सध्या शिवसेना, अकाली हे दोन मित्रपक्ष बाहेर पडल्याने आणि रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने तीन कॅबिनेट मंत्रिपदं रिक्त आहेत तर तर सुरेश आंगडी यांच्या निधनामुळे एक राज्यमंत्रीपद रिक्त आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर हा कॅबिनेट विस्तार राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असणार आहे.

दरम्यान आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

नारायण राणे हे कोकणातील मोठे नेते आहेत, आणि महाराष्ट्रातील मराठा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळे जर राणे यांची मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास महाराष्ट्रामध्ये भाजपला चांगला फायदा होऊ शकतो. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

IMP