नारायण राणेंची वेगळी चूल ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची स्थापना

वेबटीम : एक स्वाभिमान दुखावलेला नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा.

गेल्या अमेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी आज आपली नवीन दिशा जाहीर केली आहे. राणे हे आता नवीन पक्ष स्थापन करणार असून त्यांच्या पक्षाच नाव ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ हे असणार आहे.

काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजपकडून सध्यातरी नारायण राणे यांच्या प्रवेशाला रेड सिग्नल आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राणे यांनी भाजपाअध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली होती. त्यावेळी सध्यातरी नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढत एनडीएला पाठींबा द्यावा असा सल्ला देण्यात आल्याच बोललं जातं. या सर्व घडामोडींवरून राणे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वच लक्ष लागले होते.