अबब… नारायण राणे अजूनही कॉंग्रेसमध्येच ?

narayan rane and pune congress office

पुणे: शिवसेना,कॉंग्रेस नंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा अटीतटीचा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे सध्या भाजपच्या खासदारकीच्या वाटेवर आहेत. तरी देखील राणे अजूनही पुण्याच्या काँग्रेसभवन मधील फलकावर झळकत आहेत.

भाजपच्या खासदारकीच्या वाटेवर असणारे नारायण राणे याचं सध्याही पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये छायाचित्रा पुरत अस्तित्व कायम आहे. कारण काँग्रेस भवनच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आजही त्यांचा फोटो झळकत आहे. याच हॉलमध्ये सर्व नेत्यांच्या पत्रकार परिषदा घेतल्या जातात. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे.

नारायण राणे नेहमी राजकारणात चर्चेचा विषय असतात शिवसेनेत असतांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर पक्षनेतृत्वावर टीका करत राणे यांनी ३ जुलै २००५ रोजी शिवसेनेला राम राम ठोकला. असाच प्रकार कॉंग्रेस मध्ये झाला. राणे कॉंग्रेस मध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेल्या बंडापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं. २००८ मध्ये पक्ष विरोधी टिप्पणीमुळे त्यांच कॉंग्रेस मधून निलंबन करण्यात आलं.

त्यानंतर भाजपमध्ये संधी मिळेल अशी वाट पाहणारे राणे यांनी अखेर स्वताचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर लगेच राणेंना भाजपमधून मंत्रीपदाची ऑफर आली. अखेर मंत्रिपद मिळेल अशी वाट पाहून थकलेला राणेंना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. पुण्यातील कॉंग्रेस भवनातील फोटो मुळे नारायण राणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.