नारायण राणेंनी पक्ष स्थापनेची घोषणा करताच ‘एनडीए’त येण्याचं आमंत्रण ?

narayan-rane

कॉंग्रेसला सोडचिट्टी दिल्यांनतर नारायण राणे यांनी आज ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नवीन पक्षाची स्थापना केली आहे. यानंतर आता पक्ष स्थापनेच्या अवघ्या काही तासांतच त्यांना भाजप प्रणीत एनडीएमध्ये येण्याचं आमंत्रण मिळाल्याही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर राणे यांनीही एनडीएमध्ये सहभागी होण्यास होकार दिल्याच कळत आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी चूल मांडत स्वतचा पक्ष स्थापन केला आहे. कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, अमित शहा यांच्या भेटी दरम्यान सध्यातरी राणे यांनी नवीन पक्ष स्थापन करत एनडीएमध्ये सामील व्हाव, अशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यानुसार आज त्यांनी पक्षाची घोषणा करताच एनडीएच निमंत्रण आल्याच बोलल जात आहे. मात्र एनडीएमध्ये जाण्याची औपचारिक घोषणा नारायण राणे कधी करणार याकडे लक्ष लागलं आहे.