नारायण राणेंना सिंधुदुर्गात मोठा फटका, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल

Narayan-Rane.

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे मतदान काही तासांवर येऊन ठेपले असतानाच नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत दाखल होत भगवा हाती घेतला आहे.त्यामुळे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला चांगलाच फटका बसला आहे.

Loading...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणेंचे पुत्र निलेश राणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र मतदानाच्या फक्त दोन दिवस आधीचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा, ६ तालुकाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत दाखल झाले आहेत.सेनेत दाखल झालेल्या स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेत या निवडणुकीत शिवसेनेकडून असल्याच जाहीर केल आहे . रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंना हा सर्वांत मोठा धक्का मानण्यात येत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार फटका बसेल असा अंदाज नारायण राणेंनी व्यक्त केला होता. परंतू निवडणुकीच्या आधीच नारायण राणेंना स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा दणका दिला आहे. तर या वेळेस रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून  निलेश राणे यांना उतरवण्यात आले आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेतून अरविंद सावंत यांना उतरवण्यात आल आहे. त्यामुळे आतापर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असे सांगितलं जात होत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हा रंगतदार सामना एकतर्फी होण्याची शक्यता आहे.Loading…


Loading…

Loading...