राणेंच्या मंत्रिपदासाठी मुहूर्त शोधून ठेवला आहे-रावसाहेब दानवे

अहमदनगर : नारायण राणे यांच्या महारष्ट्र स्वाभिमान पक्षाने एन डी ए मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ कधी पडते याकडे सगळ्यांचं लक्ष होत. पण भाजप ने राणेंच मंत्रिपद मुहूर्त पाहून ठरवण्याचा विचार केलेला दिसतोय हे आम्ही नाही खुद्द भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणतात.

मुख्यमंत्री सध्या परदेश दौ-यावर गेले आहेत. दौ-यावरून आल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. नारायण राणे यांच्यासाठीही मुहूर्त शोधून ठेवलेला आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी अहमदनगर येथे बोलताना स्पष्ट केलं आहे.