नारायण राणेंनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे का ?

शिवसेना आमदार अनिल परब यांचा भाजपला सवाल

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारून राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे का ? असा प्रश्न शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

नारायण राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला आहे, त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यानी भाजपचे सदस्यत्व कधी स्विकारले ? सदस्य असतील तर त्याची काही पावती आहे का ? नेमका कोणत्या मार्गाने त्यानी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले ? जर नारायण राणे यानी सदस्यत्व स्विकारले असेल तर त्यानी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून अनिल परब यांनी भाजपसह नारायण राणे यांनी कोंडीत पकडल आहे.

एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही आणि जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करुन घ्यावा लागते तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येतो असा नियम आहे. त्यामुळे नारायण राणे याना भाजपने सदस्यत्व कधी दिले ? जर दिले नसेल तर त्यांना राज्यसभा उमेदवारी कशी दिली ? असे अनेक सवाल शिवसेना आमदार आणि प्रवक्ते अॅड. अनिल परब यांनी उपस्थित केले आहे.

You might also like
Comments
Loading...