मुख्यमंत्र्यांच्या विधानाने राणेंच्या आशा पल्लवित: थेट फडणवीस यांच्या भेटीला राणे

टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांच लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असून राणेंना भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना दिली आहे. दरम्यान याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होताच नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले  असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या भेटीत मंत्रीपदा बाबत चर्चा होणार असल्याच बोलल जात आहे.

शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न नसून राणे यांना भाजपच्या कोट्यातून मंत्री करणार असल्याच मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी लवकरच मंत्री मंडळात येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाने राणेंच्या आशा पल्लवित झाल्याच दिसत आहे.

You might also like
Comments
Loading...