तर ठरल मग. . . नारायण राणे अखेर एनडीएमध्ये!

वेब टीम : नारायण राणे यांनी काही दिवसांपुर्वी स्वत:च्या नवीन ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. त्यानंतर दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिल होतं. अखेर नारायण राणे यांनी  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणारं असल्याची घोषणा आज सिंधुदुर्ग मध्ये पत्रकार परिषेदेत केली आहे.

Loading...

काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी १  ऑक्टोबर २०१७  रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. “मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचं आमंत्रण दिलं असून माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे,” असं नारायण राणेंनी भेटीनंतर सांगितलं. त्यामुळे राणे एनडीएत सामील होण्याबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर राणेंनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. दरम्यान नारायण राणे यांच्या घोषणेनंतर सत्तेतील मित्रपक्ष शिवसेना काय भूमिका घेणार हे पहाव लागणारे.Loading…


Loading…

Loading...