नारायण राणे श्रीमंत दगडूशेठ चरणी ; राजकीय भाष्य मात्र टाळल

पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांची गणेशावर असलेली निस्सीम भक्ती काही लपून नाही. त्यामुळेच दरवर्षी बाप्पा काहीतरी नवीन घडवतो असे राणे म्हणाले होते मात्र या बाबत प्रश्न विचारला असता यावेळेस राणेंनी बोलणं मात्र टाळल आहे. बाप्पाच्या चरणी आलो आहे राजकीय भाष्य करणार नाही अस म्हणत नारायण राणे यांनी बोलायचं पूर्णपणे टाळाल आहे.

नुकतेच नारायण राणे यांच्या घराच्या गणेशाच्या दर्शनासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली होती. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला येणारे विघ्न नक्की काय आहे ? नेहमी स्पष्ट वक्त्यव्य करणारे नारायण राणे हे मात्र बोलून दाखवत नाहीत. आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर राज्यातील फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होऊ घातला आहे त्यामुळे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.