अजित पवारांनी बांधलेली धरणे कधी भरलीच नाही, स्वतः मात्र तुडुंब – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा: अजित पवारांनी माझी चिंता करु नये. मी आगीतून फुफाट्यात पडलेलो नाही. तसेच अजित पवारांनी बांधलेली धरणे भरलीच नाहीत. ते स्वतः मात्र तुडुंब भरल्याचे म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी अजित पवारांवर उपरोधिक टीका केली आहे. मी जनतेच्या मनात आहे. मात्र अजित पवार यांनी माळेगावमध्ये जे झाले त्याचे आत्मपरीक्षण करण्याची टीका देखील राणे यांनी केली आहे.

n rane

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी नारायण राणे यांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. त्यांना फडणवीस सरकारने मंत्रीपदाचे गाजर दाखवले मात्र आता मंत्रीपद मिळेना म्हणून राणे हताश झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. यावर माजी खासदार निलेश राणे यांनी यापुढे नारायण राणेंचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांचे रात्रीचे कार्यक्रमच जाहीर करणार असल्याचा थेट इशारा अजित पवार यांना दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मराठवाड्यात सुरु असणाऱ्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आता नारायण राणे यांच्याकडून पवारांच्या टीकेचा समाचार घेण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...