Share

Narayan Rane | “उद्धव ठाकरेंचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं म्हणून…”, नारायण राणेंची बोचरी टीका

Narayan Rane | मुंबई :  १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हाती हा शुभारंभ करण्यात आल्यानंतर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी वक्तव्य केलं.

उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना कुठं राहिली आहे, ५६ आमदारांतील ५ ते ६ आमदार शिवसेनेकडे राहिले आहेत, ते सुद्धा लवकरच प्रवेश करतील, ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरचं काही असून त्यांचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते. तेव्हा असे नव्हते, असं नारायण राणे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊन चांगलं काम केलं आहे. तसेच ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना आनंद आहे. यावरून कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळीनिमित्त मी काही बोलणार नाही, असं देखील ते म्हणाले.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक व्यंग चित्र असलेला एक फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. त्या व्यंग चित्रामध्ये या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दिसत आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रा दिसत आहे. या व्यंगचित्रात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही आहेत. ते आपल्या वडिलांना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना ‘ बाबा इथलं झालं असेल तर तिकडे मुजरा घालायला चला’, असं म्हणत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | मुंबई :  १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now