“…यामध्ये राज्य सरकारचे कोणतेही योगदान नाही”, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राणेंचा टोला
मुंबई : मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आज (७ एप्रिल) अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला असून एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नारायण राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला. एसटी कर्मचाऱ्यांची जिद्द, चिकाटी व त्यागाच्या भूमिकेतून तसेच अन्यायाविरोधात हा संप झाला होता. अखेर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. कर्मचाऱ्यांची एकजूट व त्याग यांतून हा विजय प्राप्त झाला आहे. यामध्ये राज्य सरकारचे कोणतेही योगदान नाही’, असे राईं म्हणाले आहेत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढत्या पेट्रोल-डीझेल किमती विरोधात राष्ट्र्वादी पक्ष आंदोलन करणार- अजित पवार
- शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”
- सत्ताधाऱ्यांना सणसणीत उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची होणार ‘उत्तर’सभा
- IPL 2022 : एक ओव्हर आणि ३५ रन्स..! मुंबईच्या गोलंदाजाला कमिन्सनं धुतलं; पाहा तुफानी बॅटिंगचा VIDEO!
- “…मग नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला?”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना सवाल