Narayan Rane। मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आक्रमक झाल्याचं महाराष्ट्राने पहिले. पण आज जवळपास सरकार स्थापन होऊन २६ दिवस झाल्यानंतर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. मात्र या मुलाखतीनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
नारायण राणे म्हणाले की, एका बाजूला पदावरून खाली उतरतो, दुसऱ्या बाजूला युवराज आदित्य ठाकरे व्हिक्टरी दाखवतात, बॅक टू द पव्हेलियन.. मातोश्रीत आलात व्हिक्टरी.. अरे मुख्यमंत्री पद गेलं आणि व्हिक्टरी काय. आदित्य काय करतात आणि उद्धव काय करतात काही मेळ नाही. महाराष्ट्रभर यात्रा गद्दारांना धडा शिकवा.. कोण शिकवणार? आदित्य ठाकरेंना शेंबूड पुसता येतो का, कुणाला काहीही गद्दार म्हणता, तुम्हा राज्य, देश माहित आहे का,. आता संरक्षण आहे म्हणून हे सुचतंयं. फक्त खोक्यात टाकण्याचं काम माहिती आहे. आजूबाजूचे निघून जातील, अशा खोचक शब्दात त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरें यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान, यावेळी पुढे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व शिवसैनिक यांची आता आठवण येत आहे. अडीच वर्षात त्यांना हिंदुत्व आणि मराठी अस्मिता आठवली नाही. सत्ता गेल्यावर तडफडत आहेत, म्हणून त्यांनी व्यथा मांडली. ते व्याकूळ झालेत मुख्यमंत्रीपद गेले. उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी जवळून ओळखतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून अडीच वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाचे भले झाले, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच – आशिष शेलार
- Shahjibapu Patil : उद्धव ठाकरे आजारी होते तर एकनाथ शिंदेंना चार्ज द्यायचा होता – शहाजीबापू पाटील
- Virat Kohli : विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा
- Baba Ramdev | रामदेव बाबांनी सुरु केली कावड सेवा; नेटकरी करतायेत ट्रोल
- Narayan Rane : उद्धव ठाकरेंना मी जवळून ओळखतो, त्यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा – नारायण राणे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<