Share

Narayan Rane । “फोटोवर दुसरा कागद टाका आणि…”; ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेला राणेंचं प्रत्युत्तर

Narayan Rane | पुणे : केंद्र सरकारच्या वतीने देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता केवळ मातोश्री पुरते मर्यादित राहिले असल्याचं राणे यावेळी बोलताना म्हणाले. शिवसेना आता राहिलेली नाही. त्यांच्याकडे केवळ सहा ते सात आमदार असून, त्यापैकी चार जण आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुण्यात केला.

राज्य सरकारकडून रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असलेल्या दिवाळीच्या किटवरती सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जातेय. याबाबत राणे म्हणाले, “फोटो दिला तर बिघडले कोठे ? तुम्हाला त्याच एवढंच वाईट वाटत असेल तर त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हीही फोटो लावून नागरिकांना कीट द्या. परंतु संकुचित वृत्ती ठेवू नका.”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊन चांगलं काम केलं आहे. तसेच ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना आनंद आहे. यावरून कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळीनिमित्त मी काही बोलणार नाही, असं देखील ते म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या राजकीय आरोप- प्रत्यारोपांमुळे राजकारणातील स्तर खालावत चालला असल्याचं चित्र आहे. या संदर्भात राणे म्हणाले, ”महाराष्ट्राच्या राजकारणातील स्तर खालावलेला नाही. विरोधकांच्या वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. मला राजकारणातील स्तर घसरू नये, असे वाटते. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे राज्य सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात राणे म्हणाले, “याबाबत पुण्यातील लोकांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नसल्याचं राणे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातील तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आठ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. या देशात दहा लाख तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. पहिल्या टप्प्यात आज देशभरात 75 हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवात तरुण- तरुणींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असंही राणे म्हणाले. राज्यातील जनतेला दिवाळीचं रेशन मिळालं नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाईट वाटत असेल तर विरोधकांनी शिधा द्यावा. विरोधकांना घर बसल्या काही काम उरलं नाही. ते फक्त टीका करत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुणे : केंद्र सरकारच्या वतीने देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics Pune

Join WhatsApp

Join Now