महाराष्ट्राला ड्रायव्हर नको तर मुख्यमंत्री हवा आहे; राणेंची तोफ धडाडली

narayan rane

मुंबई- महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. राज्य सरकारच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली आहेत. सरकारमधील मंत्री ठाकरे सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचत आहेत तर विरोधक सरकार कसे अपयशी ठरले हे दाखवून देत आहेत.

यातच खासदार नारायण राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री अडकले आहेत. त्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये ६५ हजार कोटींच कर्ज काढून राज्य दिवाळखोरीत नेलं असल्याचंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राणे म्हाणाले,उद्धव ठाकरे यांच्या हाती गाडीचं स्टेरींग आहे, राज्याचं नाही. महाराष्ट्राला ड्रायव्हर द्यायचा नव्हता, मुख्यमंत्री द्यायचा होता. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री राज्याला मिळाले. महाराष्ट्राला ही सत्ता पोषक नाही.
हे सरकार गेल्यानंतर दोन मार्ग आहेत. दोन पक्षापैकी एक पक्ष येईल किंवा राष्ट्रपती राजवट लागू शकेल. राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं असं राणे म्हणाले.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या मुलाखतीवर टीका केली आहे. दरदरून घाम फुटल्यामुळे तुमचे मर्द तूर्तास क्वारंटाईन झाले आहेत… त्यांचे सोडा तुम्ही गेले 8 महिने क्वारंटाईन आहात. आधी घराबाहेर तर पडा…असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या