राज्याच्या परिस्थितीला शिवसेनेसोबत भाजपही तितकाच जबाबदार; राणेंची प्रथमच भाजपवर टीका

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस सोडून स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करत नारायण राणे यांनी भाजप प्रणित रा.लो.आ मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या नारायण राणे यांना भाजपकडून काही तसा प्रतिसाद येताना दिसत नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी आता शिवसेनेसोबत भाजपला सुद्धा लक्ष केल आहे. औरंगाबाद मध्ये झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जाहीर सभेत नारायण राणे यांनी राज्याच्या सध्याच्या स्थितीला शिवसेनेसोबत भाजपही तितकाच जबाबदार असल्याची टीका केली आहे.

शितीमाला हमीभाव मिळाला नाही, सोयाबीनला दीडपट भाव मिळाला नाही, कर्जमुक्ती झाली नाही. राज्याच्या या अवस्थेला जितकी शिवसेना जबाबदार आहे तितकाच भाजपसुद्धा जबाबदार असल्याचा घणाघात नारायण राणे यांनी भाजपवर केला आहे.