‘उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे’

टीम महाराष्ट्र देशा : ‘उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात एकदाही प्रयत्न केले नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे किती नुकसान होईल, याचे माहीत नाही पण राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे, ‘अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. ते शनिवारी पुण्यातील ‘सॅटर्डे क्लब’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राणे यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच महाविकास आघाडी सरकारवर दिखेल निशाणा साधला.

Loading...

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘ते मुख्यमंत्री होतील, असे कधीच वाटले नव्हते. माझ्या महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे जाईल याची चिंता मला आहे, अशी खंत नारायण राणे यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, मुंबईतील ‘नाईट लाईफ’च्या प्रश्नावर राणे म्हणाले, कोणत्याही मुंबईकराने ‘नाईट लाईफ’ची मागणी केली नव्हती. नाईट लाईफ हा केवळ ‘बालहट्ट’ आहे. बालहट्ट पुरवण्या पेक्षा मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांची सुरक्षितता विचारात घेणे गरजेचे आहे, असे म्हणताना राणे यांनी नाईट लाईफ या संकल्पनेवर टीका केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण