Share

Narayan Rane | ‘शेंबडा मुलगा’ उल्लेख करत नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्ला

मुंबई :  सध्या राज्यात अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीच वार घुमत आहे. त्यामुळे सगळ्यांच लक्ष त्याकडेच लागलं आहे. त्याचबरोबर या निवडणुकीवरून राजकीय पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगेलेली पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी आदित्य ठाकरेंबाबत विचारलं असता, नारायण राणेंनी ‘शेंबडा मुलगा’ असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. नारायण राणे म्हणाले की, “ऐ, आता तुम्ही हेच प्रश्न विचारणार तर मी इथं जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणेन. कसला आदित्य शेंबड्या मुलांचे प्रश्न मला विचारतो तू”

त्यानंतर राणेंनी महाविकास आघाडीवरही सडकून टीका केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांचे नेते एकत्र आले होते. यावर नारायण राणेंना विचारलं असता ते म्हणाले, “सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होत नाही. ज्यांमध्ये शक्ती नसते ते असे एकत्र येऊन दाखवतात की आम्हाला उब मिळालीय आमच्यात शक्ती आली आहे. त्याचबरोबर देशात भाजपाची सत्ता आहे. राज्यात भाजपाची सत्ता आहे. देशातील जास्तीत जास्त राज्यांमध्येही आमची सत्ता आहे. त्यामुळे शक्ती ही भाजपाकडेच आहे.”

उद्धव ठाकरेने उगाच बडबड करु नये

तसेच, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनाही लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेला भाषा सुधरायला सांगा. हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना सरकार. आता म्हणे मैदानात या. आम्ही मैदानातच आहोत. ‘मातोश्री’ सोड तरी. ‘मातोश्री’चा दरवाजा उघडून बाहेर तरी बघ ना जग कसं आहे. उद्धव ठाकरेने उगाच बडबड करु नये, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई :  सध्या राज्यात अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीच वार घुमत आहे. त्यामुळे सगळ्यांच लक्ष त्याकडेच लागलं आहे. त्याचबरोबर या निवडणुकीवरून राजकीय …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now