‘शिवसेनेने पैसे घेऊन तानाजी सावंतांना मंत्रिपद दिलं’

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी शिवसेनेने पैसे घेवून तानाजी सावंतांना मंत्रिपद दिलं आहे असा आरोप शिवसेनेवर केला आहे. तसेच शिवसेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

शिवसेनेवर टीका करताना राणे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेना ही शिवसेना होती. पण, आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही.त्यामुळे पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येतं, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत’ अस विधान केले आहे.

तसेच भाजप प्रवेशावर भाष्य करताना लवकरच मी भाजपात प्रवेश करणार आहे. मात्र माझ्या पक्षप्रवेशात शिवसेना आडकाठी घालत आहे. कारण उद्धव ठाकरे यांना चांगल बघवत नाही, असही विधान त्यांनी केले आहे. मला भाजपनं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलवल्यानंतर मी गेलो. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केलं आहे. मी भाजपात जाणार हे नक्की आहे. तसेच उद्धव ठाकरे सोडले तर सर्व राजकीय पक्षात माझे चांगले संबंध आहेत असंही राणे म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना राणे यांनी ‘शिवसेना छगन भुजबळांना शिवसेनेत घ्यायला तयार आहे. शिवसेनेला प्रदीम शर्मा, भुजबळ चालतो फक्त नारायण राणे चालत नाही. त्यांना राणेंची फार भीती वाटते. मात्र मलाच शिवसेनेत जायचं नाही असंही राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या