fbpx

विधानसभा निवडणूक युतीसोबत लढणार का? नारायण राणे म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राणे यांनी भाजपसोबत राहणार की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना याचा निर्णय येत्या १० दिवसात घेणार असल्याचं सांगितले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीविषयी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात याची प्रतीक्षा आहे असं विधान केले.

राणे यांनी ‘मी भाजपमध्ये राहणार की माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. येत्या चार पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत निर्णय कळवणार आहेत, त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं नारायण राणेंनी सांगितले आहे.

दरम्यान, नारायण राणे हे आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये आले. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतू तेथे त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते भाजपचे सहयोगी पक्ष झाले. सध्या ते राज्यसभेवर खासदार आहेत.