राजकारणात नाते आणि नैतिकता यांना स्थान नाही; नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई: मुंबईतील मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेने फोडल्यानंतर राज आणि उध्दव ठाकरे यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. या दोघांमधला वाद म्हणजे घरगुती मामला असून त्यावर आपण भाष्य करणार नाही, मात्र राजकारणात नाते आणि नैतिकता यांना आता स्थान राहिलेले नाही, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेने आडकाठी लावल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला गेला होता.