fbpx

आम्ही हरलो असलो तरीही पराभव आम्हाला मान्य नाही – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

या निवडणुकीच्या निकालाविषयी भाष्य करताना तळकोकणात आम्ही हरलो असलो तरीही पराभव मान्य नसल्यांची मतं नारायण राणे वक्त केलं आहे. तसेच कोकणात सेनेचा उमेदवार निवडुन येण संशयास्पद असल्याचंही राणे म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावरचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. या पराभवामुळे कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे.

पुढे बोलताना राणे यांनी कालचा निकाल म्हणजे हेराफेरी असून निकालावर संशयाला जागा निर्माण होत आहे. त्यामुळे या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार विचार करायचा की नाही यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचे राणेंनी सांगितले