मी संतुष्ट आणि समाधानी आहे, मात्र महत्त्वाकांक्षा मात्र जरूर आहे-नारायण राणे

fadnavis-rane

मुंबई: नारायण राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आत एन डी ए मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिवाळी नंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत नारायण राणे यांची वर्णी आता जवळपास निश्चित झाल्यानंतर नारायण राणे यांनी यावर आपल मत व्यक्त केलय.

मला कोणत्याही अपेक्षा नाहीत, महाराष्ट्रात सर्वच पदे मी भूषवली आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले असतील, तर ते खरेच ठरतात अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी यावर दिली आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळेल असे स्पष्ट संकेत कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावर आज माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, की मी संतुष्ट आणि समाधानी आहे, मात्र महत्त्वाकांक्षा मात्र जरूर आहे.