मंत्रीपद रोखण्याची ताकद सेनेत नाही; भाजपमधील ज्योतिषांमुळेच मंत्रिपदास विलंब-नारायण राणे

सांगली: आपलं मंत्रीपद रोखण्याइतकी ताकद शिवसेनेत उरलेली नाही. मात्र, भाजपकडे ज्योतिषांची संख्या जास्त असल्याने कदाचित मंत्री मंडळाच्या विस्तारास मुहूर्त लांबला असावा. असा टोला नारायण राणे यांना भाजप आणि शिवसेनेला लावला आहे.

तर दुसरीकडे आजपर्यंत आपणास मिळालेली पदे ही गुणवत्तेवर मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला जाईल असा विश्वास देखील नारायण राणेंनी व्यक्त केला आहे.

bagdure

शिवसेनेची ऑफर

आपणास सर्वच पक्षात सहभागी होण्याचे आमंत्रण होते. सेनेनेही एक वर्षांपूर्वी पक्ष प्रवेशासाठी ऑफर दिली होती. मात्र, आपण सर्वधर्म समभाव या विचारावर नवीन पक्ष स्थापन केला असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपा आपणास फसवेल असे वाटत नाही. असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विस्तासाठी सध्या नारायण राणे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या पश्चिम महारष्ट्रात असून सांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

You might also like
Comments
Loading...