‘भाजपने मला राज्यसभा दिली ,आता हिंमत असेल तर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर जाऊन दाखवावं.’

narayan rane and udhav thackeray

मुंबई :’भाजपने मला राज्यसभा दिली आहे. त्यामुळे आता हिंमत असेल तर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर जाऊन दाखवावं.’अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. भाजपच्या विजया रहाटकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नारायण राणेंच्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या पार्श्वभूमीवर बोलताना राणे यांनी सेनेवर ही टीका केली आहे.

काय म्हणाले नारायण राणे

‘मला भाजपकडून उमेदवारी, तरीही शिवसेना सत्तेत आहे. जसं सांगतात तसं वागत नाही. त्या पक्षाला शिवसेना म्हणतात. भाजपने मला राज्यसभा दिली आहे. त्यामुळे आता हिंमत असेल तर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर जाऊन दाखवावं. पण शिवसेना आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाही.’