नारायण राणे भाजपच्या मुख्यालयात; लोकसभा निवडणूक जाहिरनामा समितीच्या बैठकीला हजर

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वी भाजपानं जाहीरनामा समितीत स्थान दिलं होत. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात भाजप जाहिरनामा समितीची बैठक होती. या बैठिकाला नारायण राणे हे उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा ठरवण्यासाठी भाजपानं वीस सदस्यांची समिती तयार केली आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. त्या समितीमध्ये नारायण राणे यांचा समावेश होतो. खासदार नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली होती. मात्र आज दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय लोकसभा निवडणूक जाहिरनामा समितीच्या बैठकीला हजेरी लावण्याने नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.

या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह समिती मधील वीस सदस्य हजार होते.