Share

Narayan Rane | नारायण राणे यांना झटका! कोर्टाच्या आदेशानंतर ‘अधिश’ बंगल्यावर हातोडा

Narayan Rane | मुंबई : भाजप (BJP) पक्षातील बडे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिल्याने जुहू येथील अधिश (Adhish Bunglow) बंगल्यावर अखेर हातोडा पडला आहे. राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम सुरू झालं आहे. स्वत: नारायण राणे यांनीच हे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.

राणे यांच्या अधिश बंगल्यात अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार होती. राणे यांच्या बंगल्याची पाहणीही केल्यानंतर महापालिकेने नोटीस बजावली होती. या प्रकरणी राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही पालिकेचा रिपोर्ट ग्राह्य धरून राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं मान्य केलं होतं.

या संपुर्ण प्रकणानंतर येत्या दोन आठवड्यात बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. राणे यांनी स्वत: हे बांधकाम पाडून घ्यावं किंवा महापालिका तोडक कारवाई करेल, असं कोर्टाने म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | मुंबई : भाजप (BJP) पक्षातील बडे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिल्याने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now