‘मी पदावर असलो नसलो तरी उजनीच्या पाण्याबाबत लढा दिला आहे हे जनतेस सारे ठाऊक आहे’

narayan patil

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्ष व संघटनांनी उजनी प्रश्नासाठी एकत्र येऊन शासनासमोर आपली बाजू मांडल्यास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा न्याय व हक्काचे पाणी अबाधित राहू शकते,असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. सोलापुर येथे सोलापुर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माढा तालुक्यातील शिवसेना नेते संजय कोकाटे उपस्थित होते.

याबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले कि, उजनी धरणाच्या निर्मिती साठी माझ्या तालूक्यातील 22 गावांनी त्याग केला आहे. या धरणावर जरी संपुर्ण महाराष्ट्राचा अधिकार असला तरी पहिला अधिकार हा धरणग्रस्तांचा आहे. उजनी धरणाच्या पाण्याचे वाटप लवादा मार्फत झाले असतानाही या पाणी वाटपात काही नवीन क्लुप्ती काढून जर इंदापुर तालुक्यातील नियोजित उपसा सिंचन योजनेस पाच टिएमसी पाणी दिले जात असेल तर हा उजनीच्या मुळ जलसाठ्यावर परिणाम करणारा असा निर्णय आहे.

माझ्या करमाळा तालुक्यातील शेतकरी आता कुठे विकासाच्या वाटेवर आला असता परत त्यांना जलसंकटात टाकुन आर्थिक नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण कायदेशीरपणे जनतेची बाजू न्यायालयात व शासन दरबारात मांडत आहोत. आज सोलापुर जिल्ह्यातील बहुतांश तालूक्यात उजनीचे पाणी शेतीसाठी किंवा पिण्यासाठी तरी पोहचले आहे. उजनी गाळाने अर्धी भरुन गेली आहे. यामुळे कागदोपत्री 115 टिएमसी पाणी साठा असलेले हे धरण अतिवृष्टीत 100 टक्के पाण्याने भरले तरी प्रत्यक्षात मात्र अर्धेच असते हि बाब अधिकारी व पाटबंधारे विभाग यांना पुर्ण ज्ञात आहे.यामुळे पाणी वाटप झालेल्या योजना कसेतरी काटकसरीने पाणी वापरत पाणी टंचाईस तोंड देत असताना यातुन पाच टिएसी पाणी वाढीव सिंचन योजनेस देणे हि बाब उजनीच्या मुळ आराखड्यावर हल्ला करण्यासम आहे.

हा लढा आता शेतकऱ्यांचा असून यासाठी मी शेतकऱ्याची बाजू घेऊन यात उतरलो आहे. आपण पदावर सत्तेत असलो नसलो तरी उजनीच्या पाण्याबाबत लढा दिला आहे. तालुक्यातील जनतेस हे सारे ठाऊक आहे. यामुळे राजकिय स्टंटबाजीसाठी वक्तव्ये करणारा कार्यकर्ता मी तर नाही. वास्तविक या जिल्ह्यातील सर्व संघटना व पक्ष यांना एकत्र येण्याचे आवाहन आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत असुन सोलापुर जिल्ह्यातील या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एकत्रीतपणे लढा देणे हि काळाची गरज आहे.उजनीच्या पाणी वाटपात हस्तक्षेप होऊन जर असे काहीतरी नवीन क्लुप्ती काढुन पाणी जाणार असेल तर या कृतीस अगदी सुरुवातीसच प्रतिबंध करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात जशी सरकारे बदलतील तसे उजनीतील पाणी कोणत्याही भागात पळवून नेले जाऊ शकते आणि त्यास मान्यता सुद्धा मिळत राहतील.

सरकारे येतील जातील, अधिकारीही बदली होऊन दुसरीकडे जातील पण आजच्या या बाबीचा गंभीर परिणाम मात्र करमाळा व अन्य तालूक्याच्या भविष्यावर होईल. तेंव्हा सर्वानी एकत्र येऊन राजकारणविरहित लढा दिल्यास निश्चितच न्याय मिळेल. याबाबत सर्वांच्या सल्ला व मार्गदर्शन सुचनांचा समावेश करुन एका कृती समितीची स्थापना केली जावी असे आपले वैयक्तिक मत असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच या प्रश्नाबाबत राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्व महत्वाचे नेते यांच्याकडे साकडे घालणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

IMP