कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बागल गटाने लुबाडले : नारायण पाटील

करमाळा : १९८९ पासुन सभापती जयवंतराव जगताप यांनी पारदर्शक पणे काम केलेले आहे. काही भ्रष्ट मंडळी ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. मकाई, आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.पण भाऊंवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही म्हणून विकासाच्या व नैतिकतेच्या राजकारणासाठी धाकटा भाऊ या नात्यानी भाऊंना बिनशर्त पाठींबा दिलेला आहे असं म्हणत करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी बागल गटावर हल्लाबोल केला.रयत भवन येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

पारदर्शक कारभार अन् शेतकरी विकासासाठी आपण यूतीच्या माध्यमातून रणांगणात उतरलो आहोत. तालुक्यामधील शेतकऱ्यांची बाजार समिती असलेल्या बाजार समितीच्या उभारण्यात कै. देशभक्त नामदेवराव जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. स्थापनेपासून आज तागायत शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. विवीध विकास कामाच्या माध्यमातून तालुक्यात विधानसभेच्या माध्यमातुन विकासाची ‘गंगोत्री ‘ आणली. दहिगाव उपसा सिंचनाच्या नावाखाली बागलांनी राजकारण केले व तालुक्याला विकासापासून वंचीत ठेवले आहे जनतेला त्यांनी फसवले
यावेळी व्यासपिठावर माजी जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जि.प . सदस्या सविताताई राजेभोसले, सभापतीप. स. शेखर गाडे, बाजार समितीचे उपसभापती जालींदर पानसरे, नानासाहेब, सुर्वे, केमचे सरपंचअजित तळेकर,जि.प . सदस्य बिभीषण आवटे, अनिरुद्ध कांबळे, महेश चिवटे, राजाभाऊ कदम, प्राचार्य जयप्रकाश बिले, प्रा. शिवाजीराव बंडगर, अॅड . अजित विघ्ने, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, माजीउपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, प. स. सदस्य अतुल पाटील, आदी उपस्थीत होते.
यावेळी बबन मेहेर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय भागडे यांनी सुत्रसंचलन करून उमेदवारांची ओळख करून दिली. यावेळी उमेदवार शंभूराजे जगताप, प्रा. शिवाजीराव बंडगर, अॅड. अजित विघ्ने, संग्राम राजे भोसले, अजित तळेकर, राजाभाऊ कदम, सौ. सविता राजे भोसले, प्रा. संजय चौधरी, प्राचार्य जयप्रकाश बिले, महेश चिवटे, पॅनल प्रमूख शहाजीराव देशमूख , विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. संदिप ठाकर सर यांनी आभार मानले. या सभे साठी
सागर दोंड, आदम शेख, रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, दादासाहेब लबडे, दादा कोकरे, वंदन नलवडे, दत्तात्रय नलवडे, कल्याण होगले, दादा साळुंके, गोरख लबडे, शहाजी शिंगटे, जनार्दन नलवडे, संजय शिंदे बोरगाव, झुंबर कावळे, पिटू भागडे, सुंदरदास केसकर, रामलींग देशमूखे, रामदास गायकवाड, संजय ठाकर, सरपंच दादा जाधव,नागनाथ लकडे, शहाजी धूमाळ, संग्राम राजे भोसले, तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, पोटेगाव चे सरपंच बंडू भागडे, किरण पाटील, सर्व उमेदवार, सर्व नगरसेवक, दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.