विधानसभेला करमाळ्यात बंडखोरी अटळ, आ. नारायण पाटलांचा इशारा

narayan patil vs rashmi bagal

टीम महाराष्ट्र देशा: पहिल्यांदा निवडणुकीला उभारल्यावर अनेकांनी पैलवानाला काय कळतय, याला मुंबई कुठे आहे माहित आहे का, अशी टर उडवली. मोठा संगर्षकरून आमदार झालो, रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसैनिक संभ्रमात आहे. रश्मीताई व मी दोघेही तिकिटाच्या स्पर्धेत आहोत. आमच्यापैकी एकाला तिकीट मिळाले तर दुसरा गप्प बसणार नाही. त्यामुळे करमाळ्यात आम्हा दोघांनाही उमेदवारी देऊ नये, दिल्यास बंडखोरी निश्चित आहे. असा इशारा आ नारायण पाटील यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले आहे, बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आ. दिलीप सोपल, माजी आ दिलीप माने, करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या येण्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी हुतात्मा स्मारक येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पाटील यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

शिवसेनेचा भगवा हातात घेतल्याने आमदार होण्याची इच्छा पूर्ण झाली. आज रश्मी ताईंच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही उमेदवारी न देता सावंत बंधूंपैकी कोणीही करमाळ्यातून लढावं. आम्ही एकदिलाने तुमचे काम करू. सर्वजण मांडवाखालून गेले पाहिजेत, तुमची टर्म झाल्यावर रश्मीदीदींना संधी द्या, अशी मागणी नारायण पाटील यांनी यावेळी केली.

दरम्यान, पाटील यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत उद्धवसाहेब घेतील तो निर्णय सर्वाना मान्य करावा लागेल. शिवसेनेच्या वाटेला आलेल्या सर्व जागा निवडून आणण्याचे ध्येय सर्वांनी ठेवायला हवं, असं सह संपर्कप्रमुख प्रा तानाजी सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या