नारायण पाटील व जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत?

करमाळा : करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे मिनोमिलन होणार असल्याची चर्चा तालुकाभर सुरू असल्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत विरोधकांना शह देण्यासाठी पाटील व जगताप एकत्र येतील अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

२००४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी त्यावेळचे शिवसेनेचे आमदार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला होता. या पाठिंबा मुळे जयवंत जगताप यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार कै. दिगंबरराव बागल यांचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये पाटील-जगताप हे स्थानिक निवडणूकांमध्ये एकत्रित लढले आणि यशही मिळविले.परंतु विधानसभा निवडणूक म्हटले की दोघेही एकमेकांविरोधात लढले.

सध्या आगामी बाजार समिती निवडणूकीसाठी जि. प. अध्यक्ष संजय शिंदे आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे. त्यांना शह देण्यासाठी दोन्ही पाटील-जगताप गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी तालुकावासियांची इच्छा आहे. सध्या तालुकाभर पाटील-जगताप यांचे मनोमिलन होणार अशी चर्चा जरी असली तरी दोघेही एकत्र येणार की नाही हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय