सत्तेसाठी कायपण : नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप एकत्र येणार?

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

करमाळा : करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप हे आगामी बाजार समिती निवडणूकीत एकत्र येणार असल्याची चर्चा तालुकाभर सुरू असल्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत विरोधकांना म्हणजेच राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल आणि जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांना शह देण्यासाठी पाटील आणि जगताप एकत्र येतील अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

२००४ विधानसभा निवडणूकीत सध्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी त्यावेळचे शिवसेनेचे आमदार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला होता. या पाठिंबा मुळे जयवंत जगताप यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार कै. दिगंबरराव बागल यांचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये पाटील-जगताप हे स्थानिक निवडणूकांमध्ये एकत्रित लढले आणि यशही मिळविले. परंतु विधानसभा निवडणूक म्हटले की दोघेही एकमेकांविरोधात लढले.

करमाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास, वर्तमान अन् भविष्य

सध्या आगामी बाजार समिती निवडणूकीसाठी जि. प. अध्यक्ष संजय शिंदे आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे. त्यांना शह देण्यासाठी तसेच बाजार समितीवर आपलीच सत्ता कायम ठेवण्यासाठी दोन्ही पाटील-जगताप गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी तालुकावासियांची इच्छा आहे.

करमाळ्यात नारायण पाटील-जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत?

सध्या तालुकाभर पाटील-जगताप यांचे मनोमिलन होणार अशी चर्चा जरी असली तरी दोघेही एकत्र येणार की नाही हे काही दिवसांत स्पष्ट होईल तसेच हे दोघेही एकत्र आले तर “सत्तेसाठी कायपण” असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

करमाळा : राजकीय कुरघोड्या अन् फोडाफोडीला आले उधाण

You might also like
Comments
Loading...