नारदमुनी म्हणजे प्राचीन काळातील गुगलच ; विजय रुपानींचा जावई शोध

टीम महाराष्ट्र देशा : ‘गुगल नारदमुनींप्रमाणेच माहितीचा स्रोत आहे. गुगलकडे जगात घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती असते. नारदमुनींकडेदेखील अशाच प्रकारे संपूर्ण जगाची माहिती असायची,’ असं विधान करुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुद्धा अकलेचे तारे तोडले आहेत. अहमदाबादमध्ये आरएसएसच्या शाखा विश्व संवाद केंद्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रुपानी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

दरम्यान, आधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी, महाभारताच्या काळात इंटरनेट होतं, असा अजब दावा केला होता. अमेरिका किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशानं नव्हे, तर भारतानं शेकडो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता. असे मुक्ताफळे उधळले होते.

त्यामुळे भापाचे नेते पुराणातील नवे-नेवे शोध लावण्यात मग्न आहेत का ? असा सवाल उपस्थित होण साहजिक आहे.