fbpx

डॅशिंग विश्वास नांगरे-पाटील नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. त्यांनी आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.

डॉ रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणुन बदली झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवीन अधीक्षक म्हणून राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने यांची नियुक्ती झाली आहे.

1 Comment

Click here to post a comment