fbpx

नंदकुमार घोडेले होणार औरंगाबादचे महापौर

Nandkumar ghodele will be the Mayor of Aurangabad

औरंगाबाद :- औरंगाबादच्या महापौर पदासाठी शिवसेनेतर्फे नगरसेवक नंदकुमार घोडेले यांचे नाव जाहीर झाले आहे. भाजप-शिवसेना युतीमध्ये झालेल्या करारानुसार पुढील अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर राहणार आहे. घोडेले यांच्या नावाला गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिरवा कंदिल दाखवला आहे.