ब्रेक द चेन नव्हे, ब्रेक द लाईफ; सर्व सामन्यांच्या संतप्त भावना

नांदेड: महाराष्ट्र सरकारने अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आणि प्रत्यक्षात मात्र ब्रेक द चेनच्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केले. प्रशासनाने सर्व सामान्यांची दिशाभूल केली आहे. अगोदरचे ११ दिवस आणि तुर्तास २५ दिवस असे एकूण ३६ दिवस बाजारपेठ बंद ठेवली यात उदरनिर्वाह कसा करायचा, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करीत आहेत. हा ब्रेक द चेन या भागातील सामान्य नागरिकांसाठी ब्रेक द लाईफ ठरू शकतो अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.

अंशत: लॉकडाऊन म्हटल्याने नेहमीप्रमाणे दुकाने उघडी राहतील या विचाराने व्यापारी गाफील होते, पण मंगळवारी सकाळी जेव्हा वर्तमानपत्र वाचले तेव्हा तर त्यांना धक्काच बसला. कारण, जिल्हा प्रशासनाने रात्रीतून निर्णय बदलला होता, ब्रेक द चेनच्या नावाखाली किराणा, मेडिकल, बेकरी, दुध डेअरी, स्वीट मार्ट ही दुकाने वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

व्यापाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

परिसरात ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेश येताच मंगळवारी आणि बुधवारी ही व्यापारी संतप्त झाले आणि त्यांनी सोशल मिडियावरुन संताप व्यक्त केला. मार्मिक भाषेचा वापर करुन ब्रेक द चेनचा उल्लेख ब्रेक द इकॉनॉमी , ब्रेक द लाईफ असाही करत होते. तर ज्यांची दुकाने बंद होती असे व्यापारी आम्हीच कोरोनावाहक आहोत का? इतर दुकानांवर कोरेानाचा विषाणू जात नाही काय? असा सवाल केला. जिल्हाधिकारी नांदेड यांनी २५ मार्च ते ४ एप्रिल असे ११ दिवसांचे लॉकडाऊन लावले होते आणि आता ब्रेक द चेन् च्या नावाखाली २५ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या