नांदेड; ‘रेमडेसिवीर’चा कृत्रिम तुटवडा दूर करा, अन्यथा आंदोलन करू – भाजप

नांदेड: जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे, वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेता शासनाने वेळीच उपाययोजना करायला हव्या होत्या. पण त्यानं केल्याने आता त्याचा त्रास रुग्णांना होत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा सर्व श्रुत आहे. हा तुटवडा त्वरित दूर करावा नसता भाजपतर्फे घेराव आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन महानगर भाजपाच्या वतीने औषधी सहआयुक्त राठोड यांना देण्यात आले आहे.

महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली इतर कार्यकर्त्यांनी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोरोना आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता, गत २,३ आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांना कोविड हॉस्पिटल येथील औषधी दुकानात इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड तणावात आहेत. काही साठेबाज इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत, तसेच आपण नियुक्त केलेले अधिकारी मोबाईल उचलत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वांना रेमडेसीवीर हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत देण्याची व्यवस्था करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी,महानगर नांदेडतर्फे ‘घेराव आंदोलन’ करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे निवेदन राठोड ,सहायक आयुक्त औषध विभाग-नांदेड यांना दिले. रेमडेसीवीर इंजेक्शन चा कृत्रिम तुटवडा जाणवून,काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,कारण रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत,हे भाजपा कोविड वॉर रूममध्ये येत असलेल्या फोनद्वारे गंभीर स्थिती निदर्शनास येते आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :