नांदेडचा निकाल भाजपची लाट ओसरल्याची नांदी – नवाब मलिक

Nanded's outcome marks BJP's overturning - Nawab Malik

मुंबई : नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यामुळे भाजपची लाट आता पुर्णपणे ओसरली आहे. देशात कमळ, राज्यात कमळ, मनपात कमळ, असे भाजपचे घोषवाक्य ठरले होते. हा भ्रम नांदडेच्या जनतेने धुळीस मिळवल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नांदेडच्या विजयाबद्दल त्यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले. तसेच नांदेडच्या जनतेचे आभार मानले.‍

Loading...

पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने नांदेड मनपाच्या निवडणूकीत सर्व नैतिकता बाजुला ठेवून, पैसा, शक्ती पणाला लावली होती. लोहा कंधारचे शिवसेना आमदार चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमचेच जास्त सदस्य निवडूण आल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत होते.

मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतला जो आकडा भाजपने दिला तो फसवा होता. नांदेडच्या मतदानावर परिणाम व्हावा, म्हणून खोटे आकडे देण्यात आले. तरी नांदेडच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.Loading…


Loading…

Loading...