राणेंच्या टीकेला चव्हाणांचे कृतीतून उत्तर

नांदेड  : नारायण राणे यांनी नुकतीच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर पक्षाच्या अपयशाचे खापर फोडत पक्षत्याग केला होता. राज्यातून काँग्रेस संपवण्यासाठी अशोक चव्हाणांचे नेतृत्त्व हातभार लावत असल्याची टीका त्यांनी केली होती.

त्या वेळी अशोक चव्हाण यांनी त्यांना संयमाने उत्तर दिले होते. आता नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत यश मिळवून चव्हाणांनी राणेंना कृतीतून उत्तर दिले असल्याची प्रतिक्रीया नांदेडमधील कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली असून त्यांच्या नेतृत्वावर आमचा कायम विश्‍वास होता आणि आहे असे ते म्हणाले.